॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ ॥श्रीमंत दासबोध ॥
दशक पहिला समास नववा
Samarth says in this samasa that in this samas they pay homage to the parmarth by which Srisamarth was blessed and he blessed many. Parmarth is the only word used for Brahma, Brahmajnana and Brahmand Sadhana. Param means the best and Artha means the knowable. According to the opinion of enlightened men, to seek the best knowledge, that is, Brahman, is Parmarth.
In fact, the meaning is very simple. He is easily subdued if he has intercourse with saints. But he has become very difficult to get because he missed this worm. Similarly, there are various types of tools but they are easy to borrow. That is, they bear fruit over time.We have to wait for that. But since Parmarth is a very cash transaction, there is immediate fruit, there is immediate vision of Brahmaswarupa. The Atmasvarupa is described in Vedanta and Shastra. It comes with a very real experience.
समर्थानी या समासात सांगतात कि ज्या परमार्थामुळे श्रीसमर्थ धन्य झाले आणि अनेकांना त्यांनी धन्य केले त्या परमार्थाला श्रीसमर्थ या समासांत वंदन करतात. ब्रह्म, ब्रह्मज्ञान व ब्रह्मज्ञानसाधना यासाठी परमार्थ हा एकच शब्द वापरतात. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ व अर्थ म्हणजे ज्ञेयवस्तु. आत्मज्ञानी पुरुषांच्या अभिप्रायानुसार सर्वोत्कृष्ठ ज्ञेयवस्तु अर्थात ब्रह्म शोधणे म्हणजे परमार्थ होय.
खरें पाहिलें तर परमार्थ अत्यंत सोपा आहे. संतसमागम केला तर तो सहज वश होतो. परंतु तो प्राप्त करून घेण्याचें हें वर्म चुकल्यामुळें तो अति कठीण होऊन बसला आहे. त्याचप्रमाणें साधनें नाना प्रकारची आहेत पण तीं संगळीं उधारीची आहेत. म्हणजे त्यांचें फल कालांतरानें मिळतें. त्यासाठी वाट पहावी लागते. पण परमार्थ हा अगदी रोकडा व्यवहार असल्यानें तेथें तत्काल फल मिळतें, लगेच ब्रह्मस्वरूपाचें साक्षात दर्शन घडतें. वेदांत आणि शास्त्रांत ज्या आत्मस्वरूपाचें वर्णन आहे. त्याचा एकदम प्रत्यक्ष अनुभव येतो.
II दासबोध दशक १ - स्तवननाम
समास ९ - परमार्थस्तवन II
॥श्रीराम॥
आतां स्तऊं हा परमार्थ | जो साधकांचा
निजस्वार्थ | नांतरी समर्थामध्यें समर्थ | योग हा ||१||
आहे तरी परम सुगम | परी जनासी जाला दुर्गम |
कां जयाचें चुकलें वर्म | सत्समागमाकडे ||२||
नाना साधनांचे उधार | हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार |
वेदशास्त्रीं जें सार | तें अनुभवास ये ||३||
आहे तरी चहूकडे परी | अणुमात्र दृष्टी न पडे |
उदास परी येकीकडे | पाहातां दिसेना ||४||
आकाशमार्गी गुप्त पंथ | जाणती योगिये समर्थ |
इतरांस हा गुह्यार्थ | सहसा न कळे ||५||
साराचेंहि निजसार | अखंड अक्षै अपार |
नेऊं न सकती तश्कर | कांहीं केल्या ||६||
तयास नाहीं राजभये | अथवा नाहीं अग्नि-
भये | अथवा स्वापदभये | बोलोंच नये ||७||
परब्रह्म तें हालवेना | अथवा ठावही चुकेना |
काळांतरी चळेना | जेथीचा तेथें ||८||
ऐसे ते निज ठेवणे | कदापि पाळतो नेणे |
अथवा नव्हे आदिक उणें | बहुतां काळें ||९||
अथवा तें घसवटेना | अथवा अदृश्य होयेना |
नातरी पाहातां दिसेना | गुरुअंजनेविण ||१०||
मागां योगिये समर्थ | त्यांचाहि निजस्वार्थ |
यासी बोलिजे परमार्थ | परमगुह्य म्हणौनि ||११||
जेंहीं शोधून पाहिला | त्यांसी अर्थ सांपडला |
येरां असोनी अलभ्य जाला | जन्मोजन्मीं ||१२||
अपूर्वता या परमार्थाची | वार्ता नाहीं जन्ममृत्याची |
आणी पदवी सायोज्यतेची | सन्निधचि लाभें ||१३||
माया विवेकें मावळे | सारासारविचार कळे |
परब्रह्म तेंहि निवळे | अंतर्यामीं ||१४||
ब्रह्म भासले उदंड | ब्रह्मीं बुडालें ब्रह्मांड |
पंचभूतांचें थोतांड | तुच्छ वाटे ||१५||
प्रपंच वाटे लटिका | माया वाटे लापणिका |
शुद्ध आत्मा विवेका- | अंतरीं आला ||१६||
ब्रह्मस्थित बाणतां अंतरीं | संदेह गेला ब्रह्मांडा
बाहेरीं | दृश्याची जुनी जर्जरी | कुहिट जाली ||१७||
आतां या समर्थास समर्थ | किती म्हणौनि म्हणावें ||१८||
या परमार्थाकरितां | ब्रह्मादिकांसि विश्रामता |
योगी पावती तन्मयता | परब्रह्मीं ||१९||
परमार्थ सकळांस विसांवा | सिद्ध साधु माहानुभावां |
सेखीं सात्विक जड जीवां | सत्संगेंकरूनी ||२०||
परमार्थ जन्माचें सार्थक | परमार्थ संसारीं तारक |
परमार्थ दाखवी परलोक | धार्मिकासी ||२१||
परमार्थ तापसांसी थार | परमार्थ साधकांसी आधार |
परमार्थ दाखवी पार | भवसागराचा ||२२||
परमार्थी तो राज्यधारी | परमार्थ नाहीं तो
भिकारी | या परमार्थाची सरी | कोणास द्यावी ||२३||
मुख्य परमात्मा आतुडे | अनुभवासी ||२४||
येर तो पापी जन्मला | कुळक्षयाकारणें ||२५||
असो भगवत्प्राप्तीविण | करी संसाराचा सीण |
त्या मूर्खाचें मुखावलोकन | करूंच नयें ||२६||
भल्यानें परमार्थीं भरावें | शरीर सार्थक करावें |
पूर्वजांस उद्धरावें | हरिभक्ती करूनी ||२७||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
परमार्थस्तवननाम समास नववा || ९ ||
No comments:
Post a Comment