Friday, May 15, 2020

Dasbodh दासबोध Dashak १ Samas २

Dasbodh दासबोध Dashak १ Samas २

 जय जय रघुवीर समर्थ ॥ ॥श्रीमंत दासबोध ॥ 


दशक पहिला समास दुसरा

The ability to understand the meaning of human beings is the abode of Sriganesha and it is the form of knowledge. For the destruction of ignorance and the attainment of knowledge, it is necessary to have the grace of Ganesha. He is the one who solves the problems that come in the way of knowledge. Here is a captivating description of the nature of that shriganesh.

II  दासबोध दशक १ - स्तवननाम
     समास २ - गणेशस्तवन  II

॥श्रीराम॥ 
ॐ नमोजि गणनायेका | सर्वसिद्धिफळदायेका |
 अज्ञानभ्रांतिछेदका | बोधरूपा ||१||

मराठी अर्थ :

सर्वसिद्धीचे फळ देणारा, अज्ञानरुपी भ्रमाचा नाश करणारा

ओंकाररुप नि बोधरुप अशा गणनायकास वंदन करतो.


माझिये अंतरीं भरावें | सर्वकाळ वास्तव्य करावें |
 मज वाक्‍शून्यास वदवावें | कृपाकटाक्षेंकरूनी ||२||
गणपतीने सदैव माझ्या अंतःकरणात वास करून माझ्यावर
कृपा करुन मला हा ग्रंथ वदवण्यास योग्य करावे.

तुझिये कृपेचेनि बळें | वितुळती भ्रांतीचीं पडळें |

 आणी विश्वभक्षक काळें | दाश्यत्व कीजे ||३||

तुझ्या कृपेच्या जोरावर भ्रम आणि आज्ञान यांचे

आवरणविरुन जातात विश्वभक्षक काळ तुझा
दास होऊन सारी विघ्नें नाहिसी होतात.

येता कृपेची निज उडी | विघ्नें कांपती बापुर्डी |

 होऊन जाती देशधडी| नाममात्रे ||४||

इतकेच नव्हे तर तुझ्या नामस्मरणाने संकटे भयाने

थरथर कापू लागतात. विघ्ने देशधडी होतात

अर्थात नाश पावतात.


म्हणौन नामें विघ्नहर | आम्हां अनाथांचें माहेर |

 आदिकरूनी हरीहर | अमर वंदिती ||५||

आम्हा अनाथांचे माहेरघर असलेल्या गणरायास,

हरीहर म्हणजे विष्णु व शंकरादि ज्यास वंदन करतात,

त्या गजाननास विघ्नहर म्हणतात.


वंदुनिया मंगळनिधी | कार्य करितां सर्वसिद्धी |

 आघात अडथाळे उपाधी | बांधू सकेना || ६||

म्हणून या मंगळनिधीस अर्थात कल्याणकारकास
वंदन करून कार्यास सुरुवात केल्यास ते
सिद्धीस जाते.

जयाचें आठवितां ध्यान | वाटे परम समाधान | 

नेत्रीं रिघोनियां मन | पांगुळे सर्वांगी ||७||

ज्याचे ध्यान केले असता परमसमाधान लाभते.

मन डोळ्यांमध्ये अवतरून बाकी सर्व क्रिया

बंद करून ते रूप पाहू लागते.


सगुण रूपाची टेव | माहा लावण्य लाघव | 

नृत्य करितां सकळ देव | तटस्त होती ||८||

ते गणेशाचे रुप अत्यंत विलक्षण असून सर्व देव
तटस्थ होऊन त्या लावण्यलाघव रुपाचे सुंदर
नृत्य पाहण्यांत ते मग्न  होतात.

सर्वकाळ मदोन्मत्त | सदा आनंदे डुल्लत |

 हरूषें निर्भर उद्दित | सुप्रसन्नवदनु ||९||

सर्वकाळ मदमस्त, आनंदात डुलणार्‍या, हर्षभरीत,

प्रसन्नवदनी गणेशाच्या गंडस्थळातून सदासर्वदा

मद गळत असतो.


भव्यरूप वितंड | भीममूर्ति माहा प्रचंड |

 विस्तीर्ण मस्तकीं उदंड | सिंधूर चर्चिला ||१०||

भव्य, धिप्पाड, प्रचंड देहाचा, महाशक्तिमान आणि
कपाळावर शेंदूर लावलेला असा तो असतो.

नाना सुगंध परिमळें | थबथबां गळती गंडस्थळें |

 तेथें आलीं षट्पदकुळें | झुंकारशब्दें ||११||

त्याच्या थबथबणार्‍या गंडस्थळातून स्रवणार्‍या
मदासविविधप्रकारचे सुगंध येतात त्यामुळे
भुंगे घुंघूं आवाजकरीत त्याच्या डोक्याभोवती
घोंगावत असतात.

मुर्डीव शुंडादंड सरळे | शोभे अभिनव आवाळें |

 लंबित अधर तिक्षण गळे | क्षणक्षणा मंदसत्वी ||१२||

त्याची मुडपलेली सोंड एखाद्या सोटासारखी असून
त्याच्या कपाळावर दोन आवाळे शोभून दिसतात.
खालचा ओठ लोंबलेला असून उग्र गंधाचा मद
सतत झिरपत असतो.

चौदा विद्यांचा गोसांवी | हरस्व लोचन ते हिलावी |

 लवलवित फडकावी | फडै फडै कर्णथापा ||१३||

हा चौदा विद्यांचा स्वामी असून, सतत उघडझाप
करणारे बारीक डॊळे व पंख्यासारखी उघडझाप
करणारेकान सतत फडफड आवाज करीत असतात.

रत्नखचित मुगुटीं झळाळ | नाना सुरंग फांकती कीळ |

 कुंडलें तळपती नीळ | वरी जडिले झमकती ||१४||

रत्नखचित मुगुट तेजाने झळकत असून त्यातून
विविध सुंदर नयनमनोहर रंग फांकले जातात. 
नीलमण्यामुळे कानातील कुंडले चमकत असतात

दंत शुभ्र सद्दट | रत्नखचित हेमकट्ट | 
तया तळवटीं पत्रें नीट |तळपती लघु लघु ||१५||
त्याचे दांत पांढरेशुभ्र व घट्ट असून त्यावर खालील
बाजूस लहान लहान सुवर्णाची पाने असलेले
रत्नखचित सुवर्णकडे शोभून दिसत असते.

लवथवित मलपे दोंद | वेष्टित कट्ट नागबंद |
 क्षुद्र घंटिका मंद मंद | वाजती झणत्कारें ||१६||
त्याचे मोठे पोट हालत असते कमरेला जीवंत नागाचा
पट्टा असतो आणि कमरेच्या साखळीला असलेली
लहान लहान घुंगरू अगदी मंद आवाजांत मंजूळ
झणत्कार करीत असतात

चतुर्भुज लंबोदर | कासे कासिला पितांबर |
 फडके दोंदिचा फणीवर | धुधूकार टाकी ||१७||
 त्याला चार हात असून कमरेला पिंतांबर
कासलेला आहे .पोटावर कमरेवरचा नाग
मोठ्याने फुत्कार टाकीत असतो.

डोलवी मस्तक जिव्हा लाळी | घालून बैसला वेंटाळी |
उभारोनि नाभिकमळीं | टकमकां पाहे ||१८||
त्याच्या कमरेला वेढा घालून बसलेला तो नाग
बेंबीपाशी फणा उभारून जिभल्या चाटत
टकमका पाहात असतो.

नाना याति कुशुममाळा | व्याळपरियंत रुळती गळां |

 रत्नजडित हृदयकमळा- | वरी पदक शोभे ||१९||

गणेशाच्या गळ्यांतील नागापर्यंत रुळणार्‍या
विविधप्रकारच्या फुलांच्या माळा; हृदयकमळावरील
रत्नजडित पदकासह शोभून दिसतात.

शोभे फरश आणी कमळ | अंकुश तिक्षण तेजाळ |

 येके करीं मोदकगोळ | तयावरी अति प्रीति ||२०||

त्याच्या एका हातात परशु तर  दुसर्‍या हातात
कमळआहे .तिसर्‍या हातात तिक्ष्ण टोकदार
अंकुश व चौथ्याहातात अत्यंत आवडता असा
मोदक घेतलेला असतो.

नट नाट्य कळा कुंसरी | नाना छंदें नृत्य करी |

 टाळ मृदांग भरोवरी | उपांग हुंकारे ||२१||

अनेक प्रकारच्या हावभावांचे कलाकौशल्ययुक्त
नृत्य करण्यात पटाईत असणार्‍या या गणेशाचे
साथीला टाळ,मृदंग अशी वाद्ये असतात.

स्थिरता नाहीं येक क्षण | चपळविशईं अग्रगण |

 साजिरी मूर्ति सुलक्षण | लावण्यखाणी ||२२||

गणपती क्षणभर सुद्धा स्थिर नसतो चपळपनातं तो
अग्री त्याची सौंदरवान मूर्ती मोठी सुंदर व देखणी दिसते.

रुणझुणां वाजती नेपुरें | वांकी बोभाटती गजरें |

 घागरियांसहित मनोहरें | पाउलें दोनी ||२३||

त्याच्या पायातील पैजण रुणझुण असा मंजूळ
आवाज करतात तर दंडातील वाक्यांचा मोठा
आवाज होत असतो दोन्ही पावला वरील घुंगुरे मंजूळ
आवाजाने मन हरण करतात.

ईश्वरसभेसी आली शोभा | दिव्यांबरांची फांकली प्रभा |

 साहित्यविशईं सुल्लभा | अष्टनायका होती ||२४||

ईश्वराच्या सभेस यामुळे शोभा येते आणि
त्याच्या दिव्यवस्त्रांच्या प्रभेच्या तेजाने सभेचा
परिसर उजळून निघतो.

ऐसा सर्वांगें सुंदरु | सकळ विद्यांचा आगरु |

 त्यासी माझा नमस्कारु | साष्टांग भावें ||२५||

असा हा गणेश सर्वांगानी सुंदर असून सर्व विद्यांचा
स्वामी असल्याने, मी त्यास अत्यंत मनोभावे
साष्टांग नमस्कार करतो.

ध्यान गणेशांचें वर्णितां | मतिप्रकाश होये भ्रांता |

 गुणानुवाद श्रवण करितां | वोळे सरस्वती ||२६||

श्रीगणेशाचे ध्यान आणि चिंतन केल्याने अज्ञानाने
भ्रमलेल्या माणसाच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडतो
श्री गणेशाच्या गुणाचे वर्णन श्रवण केल्याने त्यास
सरस्वति प्रसन्न होते.

जयासि ब्रह्मादिक वंदिती | तेथें मानव बापुडे किती |

 असो प्राणी मंदमती | तेहीं गणेश चिंतावा ||२७||

श्रीगणेशास ब्रह्मदेवसुद्धा नमस्कार करतात तेव्हा
क्षुद्र मानवाने त्यास अवश्य वंदन करावे आणि
रुपाचे चिंतन करावे.

जे मूर्ख अवलक्षण | जे कां हीनाहूनि हीन |

 तेचि होती दक्ष प्रविण | सर्वविशईं ||२८||

जी माणसे कुलक्षणी, मूर्ख व हीन असतात,
ती श्रीगणेशाच्या चिंतन,मननाने सर्व विषयांत
पारंगत होतात.

ऐसा जो परम समर्थ | पूर्ण करी मनोरथ |

 सप्रचीत भजनस्वार्थ | कल्लौ चंडीविनायकौ ||२९||

असा हा श्रीगणेश सर्वशक्तिमान असून सर्व
भक्तांचे सर्वमनोरथ पूर्ण करणारा आहे.कलियुगात
चंडी व गणपतीया देवता उपासकांना प्रसन्न
होऊन प्रचिती देतात.

ऐसा गणेश मंगळमूर्ती | तो म्यां स्तविला येथामती |

 वांछ्या धरूनि चित्तीं | परमार्थाची ||३०||

माझ्या मनातील परमार्थाची इच्छा पूर्ण व्हावी
  म्हणूनमी यथामती त्या गणेश मंगळमूर्तीची
स्तुती केली आहे.  


इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गणेशस्तवन  समास दुसरा II२II

No comments:

Post a Comment

Dasbodh दासबोध Dashak 1 Samas 10

॥   जय जय रघुवीर समर्थ ॥ ॥ श्रीमंत दासबोध ॥ दशक पहिला समास दहावा Samarth says in this Samasa that when this male body is found, so...